बावधन येथील फोटो स्टुडिओमध्ये भीषण आग; तीन फ्लॅट्सला फटका, सात नागरिकांचा बचाव
बावधन ८ डिसेंबर २०२४ : बावधनच्या येथील शिंदेनगरमधील पाच मजली इमारतीतील फोटो स्टुडिओमध्ये रविवारी संध्याकाळी मोठी आग लागली, ज्यामुळे इमारत पूर्णपणे धुराने भरून गेली आणि स्टुडिओमधील मालमत्ते चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशामक टीम वेळेवर पोहचली आणि आगीमध्ये अडकलेल्या सात नागरिकांना यशस्वीरित्या बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला सायंकाळी 5:52 वाजता कळवण्यात आली आणि अग्निशमन दलाकडून तातडीने प्रतिसाद मिळाला त्यामुळे आग लवकर आटोक्यात आण्यांना आली. माहिती मिळताच कोथरूड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणे अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. आगीमध्ये फ्लेक्स आणि फोटो फ्रेम्स सारख्या साहित्याचा संग्रह करणारा फोटो स्टुडिओ आगीमध्ये सापडला होता. या आगीमुळे आसपासच्या बिल्डिंग मधील तीन फ्लॅट्सनाही फटका बसला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दिशांनी आग थांबवण्या साठी पाण्याच्या जेटचा वापर करण्यात आला. संध्याकाळी 6:45 पर्यंत, आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि आणखी आग वाढू नये म्हणून कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजले नाहीये.